# जि. प. शाळा चिंचणीचे क्रांतिकारक पाऊल ! – सह्याद्री दर्पण
आरोग्य व शिक्षण

जि. प. शाळा चिंचणीचे क्रांतिकारक पाऊल !

सह्याद्री दर्पण
शैक्षणिक क्षेत्रात झपाट्यानं होणारी क्रांती आणि त्याला आपलसं करणारी मनोवृत्ती, याची सांगड घालत दिवसागणिक शाळा बदलाच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहेत. याच वाटेवरून मार्गस्थ होण्याची कल्पकता जि. प. शाळा चिंचणी (अं) ता. कडेगाव शाळेनं दाखविली. केवळ दाखविली नाही, तर सत्यात उतरवली.

प्राथमिक शाळांना अनेक संक्रमणातून वाट चोखाळावी लागत आहे. खासगी शाळांची रेलचेल आणि प्रभाव. सरकारी अर्थात प्राथमिक शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. गुणात्मकदृष्ट्या प्राथमिक शाळा कमी नाहीत. पण हौसेपोटी पालक खासगी शाळा जवळ करू लागले आहेत.

एका बाजूला खासगी शाळांचे आक्रमण आणि गुणात्मक दर्जा टिकविण्यासाठी प्राथमिक शाळेचे शिक्षक प्राणपणाने झुंजताना दिसतायत. आपली शाळा दर्जेदार असावी, तिथं विद्यार्थी ज्ञानसंपन्न व्हावेत म्हणून मेहनत घेत आहेत. याला जोड म्हणून गावकऱ्यांची मदत घेत आहेत. जि. प. शाळा चिंचणी शाळेनं गावकऱ्यांची मदत घ्यायचं नक्की केलं. आणि गावकऱ्यांनी मोठ्या मनानं सहकार्याची ओंजळ पुढं केली. या मदतीतून शाळेनं अत्याधुनिक ज्ञानार्जनाकडं पुढचं पाऊल टाकलं.

जि. प. प्राथमिक शाळा, चिंचणी (अं) शाळेत अत्याधुनिक आणि आकर्षक इंग्लिश लॅबचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणपद्धतीची जोड मिळावी, त्यांचा इंग्रजी शब्दसंग्रह आणि संवादकौशल्य अधिक प्रभावी व्हावं, या उद्देशाने ही लॅब उभारण्यात आली आहे.

नवीन इंग्लिश लॅबमध्ये Days of Week, Good Habits, Our Food, Grocery Section, Body Parts, Shapes, Numbers, Family, Market Section तसेच मुलांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले अनेक विषय अतिशय सुंदर पद्धतीने साकारले आहेत. लॅबमध्ये ठेवलेल्या प्रत्यक्ष वस्तू, मॉडेल्स, रंगीबेरंगी चार्ट्स आणि Activity-based learning मुळे मुलांना “पाहून–स्पर्श करून–खेळून” शिकण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की,
इंग्लिश लॅब हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. मुलांमध्ये इंग्रजीबद्दलची भीती दूर करून आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही लॅब उपयुक्त ठरेल. शाळेने केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उच्चारशुद्धता, शब्दसंग्रह, निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि संभाषण कौशल्य लक्षणीयरीत्या वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. सचिन हिंदुराव माने यांनी विद्यार्थ्यांना जेवणाची मेजवानी दिली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!