मालमत्ता कर शासन निर्णयाप्रमाणे : मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे

सह्याद्री दर्पण
कडेगाव नगरपंचायत प्रशासनाकडून मालमत्ता कर आकारणीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आता यावर मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांचा खुलासा समोर आला. “सह्याद्री दर्पण’शी बोलताना ते म्हणाले, की मालमत्ता कर आकारणी शासन नियमाप्रमाणे.
डॉ. पवन म्हेत्रे म्हणाले की, नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून कर आकारणी करण्यात आली नव्हती. ग्रामपंचायतीची आकारणी करण्यात येत होती. 21 टक्के ते 25 टक्के असा कर आकारणीचा शासन प्रस्ताव होता. यामध्ये आम्ही सर्वात कमी 21 टक्के कर आकारणीचा निर्णय घेतला. तसा ठराव करण्यात आला आहे. शहराचा विकास करायचा असेल तर कर शासन निर्णयाप्रमाणे आकारणी झाली पाहिजे. नागरिकांना यावर शंका असल्यास त्यांनी नोटिशीवर दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी दाद मागावी.
चुकीचं आढळल्यास आवाज उठवू : विजय शिंदे
मालमत्ता कर आकारणीत चुकीचं आढळल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करू. नगरपंचायत प्रशासनाने मालमत्ता कर नोटिशीद्वारे खुलासेवार माहिती दिली नाही. यामुळं नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. विकासासाठी कर आकारणी होत असेल तर शहरातील अनेक भागात मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आत्तापर्यंत कर वसुली झाली, मग विकास का झाला नाही. मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत. कर चुकवेगिरी करणाऱ्यांबाबतीत हा सर्व्हे चांगला झाला. आम्ही चुकीच्या बाजूने उभा राहणार नाही. पण सामान्य नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, असं नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते विजय शिंदे यांनी सांगितले.
