आपला जिल्हा
उत्तम तांबेवाघ यांचा प्रथम पुण्यस्मरण संपन्न

सह्याद्री दर्पण
भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ सदस्य, मुंबई पासून ते कडेगाव तालुक्यामध्ये तळागाळात बौद्धधम्म पोहोचवला, असे ज्येष्ठ बौद्धाचार्य, कालकथित उत्तम पांडुरंग तांबेवाघ यांचा “प्रथम पुण्यस्मरण विधी” भदंत डॉ. मैत्रीयघोष आयुपाल महाथेरो यांच्याहस्ते तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सांगली जिल्हाध्यक्ष, सचिव, जिल्हा संघटक व सांगली जिल्हा व कडेगांव तालुक्यातील सर्व बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्तिक पौर्णिमा बुधवार दि. ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांचे राहते घरी अंबक (ता. कडेगाव) जिल्हा सांगली येथे संपन्न झाला.
भदंत डॉ. मैत्रीयघोष आयुपाल महाथेरो उपस्थित सर्वांना”धम्मदेसना” दिली. तालुक्यातील सर्व श्रामनेर, उपासक, उपासिका व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.



